*दिंडोरीकरांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला संताप*
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली, सदर घटनेतील आरोपीस कडक शासन करुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दिंडोरीकरांनी केली आहे, घटनेच्या निषेधार्थ दिंडोरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, व्यापारी वर्गानेही आपापली दुकाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदविला,
याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर,नायब तहसिलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आले,
निवेदनात म्हटले आहे की डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर रोजी चार वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना,आरोपी विजय खैरनार याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत सोबत नेले व तिच्यावर अत्याचार करत तिचा निर्घृण खून केला, बालिका सापडत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता मोबाईल टॉवरच्या परिसरात तिचा मृतदेह गंभीर अवस्थेत आढळून आला, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला, या घटनेची वार्ता सर्वत्र वाऱ्यसारखी पसरली अशा घातकी कृत्य करणाऱ्या नराधमास कडक शासन व्हावे यासाठी दिंडोरी शहरवासीयांनी मुक मोर्चा काढला
दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत निवेदन दिले, याप्रसंगी कैलास मवाळ, जगदिश जाधव,
सचिन देशमुख,उदय आव्हाड,प्रितम देशमुख,
गणेश बोरस्ते, प्रदिप घोरपडे, हेमंत पगारे,संतोष मुरकुटे,लता बोरस्ते ,रणजीत देशमुख, नितिन गांगुर्डे, तुषार देशमुख, अनिकेत बोरस्ते,प्रमोद ढेपने,संपत बोरस्ते, प्रफुल्ल दंडगव्हाण, गंगाधर निखाडे,दत्तु भेरे,
पंकज देशमुख, कपिल बागुल, अमोल उगले, योगेश मोरे, योगेश साठे, संदीप धोंगडे, अभिषेक जंगम, प्रकाश गायकवाड, रवींद्र खराटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
चौकट
तहसील कार्यालय आवारात जनतेचा आक्रोश-
दिंडोरी तहसील कार्यालयावर मुक मोर्चा जाताच मालेगाव घटनेतील आरोपीला कडक शासन करावे त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी दिंडोरीकरांनी केली, ग्रामस्थांनी आक्रोश करत दिंडोरी पोलीस ठाणे तसेच नायब तहसीलदारांना निवेदन दिले , अशा गंभीर घटना घडू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली,


























