कास्ट्राईब जनरलच्या लढयाला यश- केंद्रप्रमुख पदोन्नती सेवाजेष्ठतेने- 

             .जितिन रहेमान
बीड ऑगस्ट कास्ट्राईब जनरल कर्मचारी संघाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांचे बरोबर संपन्न झाली. जिल्हा परिषद बीड मधील मु.का.अ.यांचे दालनात दि.13 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (साप्रवि) प्रदीप काकडे, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी हे उपस्थित होते. 18 जुलै 2025 च्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेतील निकषानुसार तसेच शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती सेवाजेष्ठतेने 30 ऑगस्ट 2025 पूर्वी करण्यात यावी नसता कास्ट्राईब सनदशिर मार्गाने जिल्हा परिषदेपुढे आंदोलन  करणार असल्याचा बैठकीमध्ये इशारा दिला.या इशाऱ्यानंतर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांनी सकारात्मक भुमिका घेतली व 18 जुलै 2025 च्या ग्रामविकास विभागाच्या अधिसुचनेतील निकषानुसार सेवाजेष्ठतेनुसार 15 सप्टेंबर पूर्वी केंद्रप्रमुख पदोन्नती करुन आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) प्रदिप काकडे यांनी ठामपणे सांगितले. तरी पण दि.30 ऑगस्ट पूर्वी केंद्रप्रमुख पदोन्नती करण्याबाबत कास्ट्राईब प्रयत्नशिल राहणार आहेत. केंद्रप्रमुख पदोन्नतीस जिल्हा परिषदेने अक्षम्य विलंब केल्यामुळे पदोन्नतीपात्र सेवाजेष्ठ शिक्षक पदोन्नतीविना सेवानिवृत्त झाले. वास्तविकपणे न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून केंद्रप्रमुख पदोन्नती करणे शक्य होते.  शासनस्तरावर शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई, शिक्षण सचिव, शिक्षण उपसचिव, ग्रामविकास सचिव यांचेकडे केंद्रप्रमुख सेवा जेष्ठतेने पदोन्नतीबाबत कास्ट्राईब जनरल कर्मचारी संघाचा पाठपुरावा सतत सुरु होता. अधिसुचना अंतिम करुन सेवाजेष्ठतेप्रमाणेच केंद्रप्रमुख पदोन्नती करणे योग्य आहे हे मा.ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिक्षण उपसचिव तुषार महाजन, ग्रामविकासाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या निदर्शनास आणून दिले व सेवाजेष्ठतेप्रमाणेच पदोन्नती करणे उचित असल्या बाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात कास्ट्राईबला यश मिळाले.यामुळे केंद्रप्रमुख पदोन्नती पात्र शिक्षकांना न्याय मिळणार आहे. केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रतिक्षा संपणार आहे. कास्ट्राईबच्या प्रदिर्घ लढयाला यश आले असून त्याचे श्रेय प्रामुख्याने कास्ट्राईब जनरल कर्मचारी संघाला मिळते. जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती 10 जून 2014 च्या ग्रामविकास च्या अधिसूचनेतील मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येणार आहे. तसेच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती संचिका साप्रवि मार्फत सादर झाली असून पुढील आठवडयात आदेश मिळणार आहेत. बैठकीसाठी कास्ट्राईबचे पदाधिकारी अनिल जाधवर, प्रकाश अहिरे, भगिरथ मस्के, डी.एस.वाघमारे, बाळासाहेब अहिरे, द.ल.वारे, जिल्हाशाखेचे पदाधिकारी भाऊसाहेब हंगे, राहुल सुपेकर, हकीम मनियार, संजय दराडे, स्वामी ढोकणे, झुंबर गव्हाणे, सोमनाथ तांदळे, सुर्यकांत शिंदे, अनिल गोल्हार, शेख जलील, प्रवीण सानप, बालासाहेब नागरगोजे, जयश्री बडे इत्यादी उपस्थित होते.
     विनित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *