निफाड (कृष्णा गायकवाड ) निफाड तालुक्यामध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ वस्तीवर हल्ले महिलांचे दागिने लंपास पोलिसांचा तपास सुरू याबाबत सविस्तर..निफाड तालुक्यातील माळसाकोरे व भुसे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला पाच ते सहा दरोडेखोरांनी एका मागून एक वस्ती गाठत गावात खळबळ उडून दिली आहे. प्रथम हल्ला शिवाजी वाळके यांच्या वस्तीवर झाला घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी विठ्ठल वाळके यांना मारहाण करून गंभीर जखमी केले त्यानंतर घरातील महिलांकडे मोर्चा वळवण्यात आला मात्र विठ्ठल वाळके यांनी प्रसंगवाधन राखत घरातील महिलांना आवाज देत घरातील लोकांना सावध केले. दरवाजाची कडी उघडू नका मुलांनी दरवाजा लावून धरल्याने दरोडेखोर हे गोंधळून गेले व त्यांनी तिथून पळ काढला त्यानंतर अर्जुन एकनाथ वाळके यांच्या वस्तीवर चोरांनी बल्ब काढून घराच्या बाहेरून कड्या लावल्या आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तेथील लोक जागी झाल्याने चोरांनी माघार घेत पळ काढला. भैरू भुसारे यांच्या वस्तीवर अशाच पद्धतीने दरवाजाला धक्के दिले गेले मात्र गडबड झाली आणि पुन्हा एकदा चोर पळाले पुढील थांबा होता राजू ( दत्तू )आबा मुरकुटे यांची वस्ती येथे दरोडेखोरांनी दरवाजा तोडून थेट घरात प्रवेश केला राजू मुरकुटे यांना मारहाण करून एका कोपर्यात बसवलं महिलांच्या अंगावरील सोने,पोत, कानातले जबरदस्तीने काढून घेतले .रोख रक्कम मागण्यासाठी धमक्या दिल्या इतक्यात राजूचं लहान मूल जोरजोरात रडायला लागलं आणि मुलाच्या रडण्याचा आवाज शेजारील रघुनाथ पांडुरंग मुरकुटे यांच्या कानावर गेला शेजारील जागे होताच चोरांनी घाई घाईने येथून पळ काढला. त्यानंतर चोरटे नागरे वस्तीवर गेले माधव नागरे यांच्या दरवाजाला धक्के दिले व सर्व घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या गणेश सोमनाथ नागरे यांची गाडी चोरांनी घेऊन पळ काढला आणि छगन नागरे यांच्या घराच्या मागे गाडी लावून दाट झाडीतून पसार झाले या या दरोडेखोरांनी चेहर्यावर अंघोळ पांगरलेली असून फक्त डोळे दिसत होते. हे दरोडेखोर हिंदी व मराठी भाषेतून बोलत होते प्रत्यक्षदर्शी राजू मुरकुटे व विठ्ठल वाळके यांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सायखेडा पोलीस करत आहेत.
निफाड तालुक्यात म्हाळसाकोरे शिवारात दरोडेखोरांचा धुमाकूळ दोघांना मारहाण महिलांचे दागिने लंपास…






















