नाशिक: भाजपा नेते माननीय श्री सुधाकर बडगुजर यांच्या वतीने सावतानगर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन मा. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, “रक्तदान ही केवळ सेवा नाही, तर ती सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे. एक युनिट रक्त अनेक जीव वाचवू शकते. अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
या रक्तदान शिबिरासोबतच मोफत आरोग्य शिबिर देखील घेण्यात आले. याचे आयोजन भाजप वैद्यकीय आघाडी आणि डॉ. उमेश मराठे यांनी केले होते. अनेक नागरिकांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
शिबिरास माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, तसेच विजय साने, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, पवन भगूरकर, अविनाश पाटील, कैलास अहिरे, उखा चौधरी, रवी पाटील, यशवंत नेरकर, करण शिंदे, सोनाली ठाकरे, सतीश सोनवणे, दिलीप दातीर, अशोक सातभाई, मनोहर बोराडे, हर्षाताई बडगुजर, नयना घोलप, प्रतिभा पवार, शीतल भामरे, नंदिनी जाधव, देवानंद बिरारी, संजय भामरे, गोकुळ नागरे, कैलास चुंभळे, पवन मटाले, प्रकाश अमृतकर, महेंद्र जाधव, अमोल शेळखे, किरण गाडे, निखिल आडे, हेमंत नेहते, शिवम शिंपी, सुमित बोराळे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरातील सहभागी डॉक्टर, रक्तदाते,कार्यकर्ते आणि उपस्थितांचे मन:पूर्वक आभार






















