पिंपळगाव बसवंत(कृष्णा गायकवाड) पिंपळगाव बसवंत नगर परिषदेतील सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा व विविध समस्यांबाबत आदिवासी उलगुलुन सेना व निर्भय महाराष्ट्र पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले याबाबत पिंपळगाव बसवंत नगर परिषद परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजेच नगरपरिषद अस्तित्वात आले पासून ते आतापर्यंत पिंपळगाव बसवंत नगर परिसरातील अनेक नगर ,उपनगर, वाडी, वस्ती, गल्ली या ठिकाणी सामान्य नागरिकांना आपल्या मूलभूत गरजांचा बळी देऊन जीवन व्यतीत करावं लागत आहे. उदाहरणार्थ पाणी ,वीज साफसफाई, गटारी स्वच्छता, पथदिवे, घरकुल योजना कर्मचारी किमान वेतन कधी लागू करणार आहे तसेच तेही वेतन वेळेवर कर्मचार्यांना दिले जात नाही नगरपरिषद वाहनांची कामे वेळेवर होत नाहीत इत्यादी. प्रकारच्या समस्यांना पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे परंतु जेव्हा जेव्हा सामान्य नागरिक नगर परिषद कार्यालयात जातो तेव्हा त्याला अनेक विभागांची नावे सांगून इथे तिथे पळविले जाते व त्या सामान्य नागरिकांची समस्या ही फक्त कागदोपत्री राहून जाते व त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही नगरपरिषद प्रशासनाद्वारे होत नाही. आम्ही नागरिक हे मान्य करतो की सदर नगर परिषदेचे अतिरिक्त अधिकारी आहेत परंतु सदर अधिकारी यांनी जर जनतेच्या प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष दिले तर बर्याच प्रमाणात नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे तसेच सरपंच कालावधीमध्ये पिंपळगावातील बरीच कामे मंजूर झाली होती व मंजूर कामे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असताना नगरपरिषदेची घोषणा झाली व नगरपरिषद अस्तित्वात आली व त्यानंतर सदरील मंजूर कामे बंद झाली नगर परिषदेकडे विचारण्या केल्यानंतर असे आढळून आले की नगरपरिषद प्रशासनाकडे निधी नाही मग मंजूर झालेला निधीचं काय? हा प्रश्न निर्माण होतो म्हणजे जर नगरपरिषद प्रशासनाने सदरील कामाचा निधी इतर ठिकाणी वापरून जनतेची इतर महत्त्वाची कामे केली असतील असे गृहीत धरले तरी मग नगरी परिषद प्रशासन हा खुलासा कसा केला नाही की थांबवलेली कामे नगर परिषद कधी सुरू करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी माननीय नगरपरिषद प्रशासनाने सदर बाबींचा खुलासा करून लेखी स्वरूपात उत्तर देऊन उपक्रम करावे व थांबलेली कामे नगरपरिषद कधी सुरू करणार त्याबद्दलचे लेखी आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने द्यावे ही नम्र विनंती सदर निवेदन मिळाले नंतर प्रशासनाने चार दिवसांचे आत उत्तर न दिल्यास भीक मागो आंदोलनाद्वारे भीक मागून नगर परिषदेस पैसे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तरी पिंपळगाव बसवंत नगर परिषद प्रशासनाने सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचे निवेदन आदिवासी उलगुलन सेना महाराष्ट्र राज्य व महात्मा रावण किंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री दत्तू झनकर व निर्भय महाराष्ट्र पार्टी पिंपळगाव बसवंत शहराध्यक्ष श्री संतोष सुरवडकर, फारुक शेख, महेश जाधव इत्यादी कार्यकर्ते यांच्यातर्फे देण्यात आले तसे न झाल्यास भविष्यामध्ये मोठ्या प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला …


























