नांदगाव शहरातील विविध प्रलंबित समास्या व प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार मागणी करून देखील महसूल आणि रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने बुधवार (दि.23) सकाळी नांदगाव -येवला रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले….
यावेळी पोलिसांना आणि रेल्वे प्रशासनाला या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.. निवेदनात म्हटलं आहे की, अनेक वर्षांपासून गिरणा धरण 56 खेडी योजनेवरील लिकेजसंदर्भात वारंवार तक्रारी करूनसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल न घेता कोणत्याही प्रकारे लिकेज काढण्याचे काम न करता सातत्याने या योजनेच्या जलवाहिन्यांवर लिकेज ठेवले जात आहे. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागते आहे. लिकेजमुळे नांदगाव रेल्वे भुयारी मार्गात वर्षभर पाणी जमा होत असते. यामुळे साठलेल्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावे लागते. बऱ्याच वेळेस विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, महिला शेवाळयुक्त निसरड्या जागेवरून घसरून पडतात. नांदगाव शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यापूर्वीच लाखो लिटर पाणी लिकेजद्वारे वाहून जाते. यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे नागरिकांना 30 दिवसांआड पाणीपुरवठा होतो. मात्र, लिकेजेस दुरुस्त होत नाही म्हणून संबंधित देखभाल, दुरुस्ती अधिकारी, मालेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करून संपूर्ण सखोल चौकशी व्हावी व संबंधित दुरुस्तीची व त्यावर झालेल्या खर्चाची वसुली संबंधितांकडून करण्यात यावी. शाखा अभियंता देखभाल; दुरुस्ती पथक उपविभाग मालेगाव या एजन्सीचा माध्यमातून चालणारा कारभार हा संपूर्णपणे असैवंधानिक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे. अरुंद भुयारी मार्ग रुंद करण्यासाठी हॉटेल नंदिनीच्या बाजूची भिंत काढून रस्ता रुंद करण्यात यावे, येवला- छत्रपती संभाजीनगर रोड येथील नागरिकांना शहरात जाण्यासाठी पादचारी पुलाची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे..यासह आदी मागण्यांसाठी येथील नांदगाव-येवला रोडवर काही काळासाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले..याप्रसंगी नांदगाव पोलिसांना व रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले..
उबाठाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, सुनील पाटील ,श्रावण आढाव ,माधव शेलार ,मुक्तता नलावडे ,शैलेश सोनवणे, निवृत्ती गुंजाळ, सतीश बारावकर, अनिल रिंढे ,संतोष वाघ ,भाऊसाहेब सदगीर ,गोरख जाधव ,सीताराम राठोड ,प्रमोद मोरे ,गौतम जैन, वसंत नागरे ,राजाभाऊ आहेर, दादाभाऊ आहेर ,बबन उगले, बाबासाहेब गायके, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

























