‘ बीडच्या :नामवंत मागासवर्गीय सेल च्या बीडच्या महिला जिल्हाध्यक्ष राहिलेल्या कर्तृत्ववान, रुबाबदार, नेतृत्ववादी, महिला, पीडित, गरजुना, आई बनून आधार देणाऱ्या निराधारांच्या आधारस्तंभ सौ. मंदाकिनी गायकवाड यांचा वाढदिवस त्यांनी नेहमी प्रमाणे हा त्यांचा वाढदिवस गरजूवंत आणि पीडित लोकांसोबत बसून साजरा करण्याचे योजिले आणि त्यांनी सहकुटुंब सहपरिवार तो बीडच्या जिव्हाळा केंद्रात साजरा केला.त्यावेळी त्यांनी त्यांचा जीवनप्रवास थोडक्यात सर्वांसमोर व्यक्त केला आणि भावनिक झाल्या. त्यांच्या सबंध आयुष्यात त्यांच्या कार्याचा त्यांनी कुठेच प्रचार, प्रदर्शन म्हणून सांगावा केला नाही महिलांचे प्रश्न असोत, कोणाला आर्थिक बाजू मजबूत नसल्याने मुलींचे विवाह असो, नोकरीच्या ठिकाणी पैसे भरणे असो, कुणाला रक्ताची गरज असो, दवाखाने किंवा परिसरातील रस्ते काम, लहान मुलांचे शिक्षण अशा अनेक बाबी त्यांनी अत्यंत कुशलपने पार पाडल्या आणि अधिकारी किंवा राजकीय नेते यांच्या समोर ते प्रश्न त्यांनी प्रकर्षाने मांडले आणि सोडवले कितीतरी मुलींचे विवाह आई बनून स्वखर्चाने त्यांनी केले मोफत रक्तदान शिबीरे राबवली कोरोना च्या काळात अनेक गरजूवंत लोकांना स्वखर्चाने मोफत धान्य वाटप केले. ज्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर गावी रहावे लागते मग कपडे किंवा शैक्षणिक साहित्य ते त्यांनी स्वखर्चाने केले. बीड मधील त्या एक अशा शिलवंत नामवंत समाजसेविका आहेत ज्यांनी आजपर्यंत कुठल्याच नेतेमंडळी किंवा संस्था किंवा अन्य लोक यांच्याकडून अद्याप डोनेशन किंवा आर्थिक मदत घेतलेली नाही. त्या बीड मधील सर्वप्रथम अशा महिला आहेत ज्यांचे स्वतःचे मोठे Electronic चे दुकान त्या चालवत आणि स्वतःचा चांगला व्यवसाय चालू असताना समजभान ठेऊन समाजाचे आपण ऋणी आहोत या भावनेने त्यांनी समाजकार्य चालू ठेवले. काही थोर संत सांगून गेल्याप्रमाणे त्या त्यांचे कार्य म्हणजे 1रुपया कमावले तर २५पैसे दान करावे उक्ती प्रमाणे त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले. अशा या गुणवंत, शिलवंत, नेतृत्ववादी अभ्यासु, मायाळू, समाजसेविकेला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
नेतृत्वगुण संपन्न समाजसेविका :मंदाकिनी गायकवाड

























