चांदवड (कीर्ती गुजराथी) –
तालुक्यातील वाकी बुद्रुक शिवारातील शेततळ्यात पडून पाण्यात बुडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मिनाबाई रामहरी मोरे (४५, रा. वाकी बुद्रुक) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. ७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेळ्या चारत असताना त्या पाय घसरून गणेश दामू कोकणे यांच्या शेततळ्यात पडल्या. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने नातलगांनी त्यांना औषधोपचारासाठी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राठोड यांनी चांदवड पोलिसांना दिली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार एन. आर. शिंदे करीत आहेत.
——–


























