लासलगांव (आसिफ पठाण )
लासलगांव व पंचक्रोशीतील नागरीकांचे तसेच लासलगांव बाजार समितीचे आराध्य दैवत प. पू. भगरीबाबा यांच्या 61 व्या पुण्यतिथीनिमित्त प. पू. भगरीबाबा मंदीर, लासलगांव येथील प्रांगणात संगीतमय श्री स्वामी समर्थ चरीत्र कथा व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप व न्यासाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी दिली.
प. पू. भगरीबाबा यांची सालाबादप्रमाणे यावर्षी गुरूवार दि. 11/12/2025 रोजी 61 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. त्यानिमित्त प. पू. भगरीबाबा मंदीराच्या प्रांगणात शुक्रवार, दि. 05/12/2025 ते बुधवार दि. 10/12/2025 ह्या कालावधीत दररोज सकाळी 07.30 ते 10.30 ह्या वेळेत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक ह. भ. प. मधुकर महाराज गांगुर्डे व ह. भ. प. अशोक महाराज संत यांच्या उपस्थित सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 04.00 ते 05.00 ह्या वेळेत संत सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशताब्दी सुवर्णमहोत्सवानिमित्त ह. भ. प. मधुकर महाराज गांगुर्डे यांच्या वाणीतुन श्री ज्ञानेश्वरीतील सदगुरू स्तवन प्रवचन, सायंकाळी 06.00 ते 07.00 ह्या वेळेत हरीपाठ, रात्री 07.30 ते 10.00 ह्या वेळेत ह. भ. प. श्री. गणेश महाराज करंजकर, भगुर यांच्या अमृतवाणीतुन संगीतमय श्री स्वामी समर्थ चरीत्र कथा व गुरूवार, दि. 11/12/2025 रोजी सकाळी 06.30 ते 07.30 ह्या वेळेत प. पू. भगरीबाबांच्या मुर्तीची विधीवत पुजा करून सकाळी 08.00 ते 10.00 वाजेपर्यंत बाबांच्या प्रतिमेची व पालखीची लासलगांव शहरातुन सवाद्य मिरवणुक काढुन मिरवणुकीनंतर गुरूवर्य ह. भ. प. श्री. रघुनाथ महाराज खटाणे (खेडलेकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.
तरी वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लासलगांव व पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती संदीप दरेकर, न्यासाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष जयदत्त होळकर, चिटणीस नरेंद्र वाढवणे व बाजार समितीचे सर्व सदस्य, न्यासाचे सर्व विश्वस्त यांनी केले आहे


























