सुरेश पवार गिरणेचा पुत्र
माणसाचा मित्र पुढे आला
मिटाया अंतर मना-मनातील
बांधावया पूल प्रेमभावे
साहित्यिक सारे करुनिया गोळा
लावलाय लळा अंतरीचा
घेतलाय वसा सावता माळ्याचा
मळा विठोबाचा फुलवाया
साहित्याचा वेलू लावलाय दारी
अवघी पंढरी उभी केली
साहित्याचा झेंडा घेऊनिया हाती पाऊले चालती पंढरीशी
चालली चालली साहित्याची वारी पंढरीच्या दारी भक्तीभावे
एका झेंड्याखाली भरलाय मेळा
साहित्याचा मळा फुलवाया
– तुकाराम ढिकले
सुरेश पवार






















