उमराणे (वार्ताहर) : स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर, उमराणे गावात शिक्षणमहर्षी, थोर समाजसेवक, उमराणे भूषण पुरस्कार प्राप्त व ग्राम शिक्षण समिती उमराणेचे संस्थापक स्व. डॉ. नाना ऊर्फ डॉ. नारायण गणेश कुलकर्णी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
आमदार डॉ. राहुल आहेर, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव देवरे आणि सरपंच कमलताई देवरे यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न झाला. स्व. डॉ. कुलकर्णी यांनी उमराणे गावामध्ये सर्वप्रथम १९५१ साली श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलची स्थापना केली, श्रीराम मंदिर बांधले आणि जवळजवळ ६० वर्षे शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांचे कार्य उमराणेकरांना माहीत व्हावे, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यांचे स्मरण राहावे या उद्देशाने ग्राम शिक्षण समितीचे माजी चेअरमन विश्वासराव देवरे यांच्या संकल्पनेतून तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने डॉ. नानांच्या ब्राँझच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम शिक्षण समितीचे चेअरमन व कृ.बा.ऊ.समिती माजी सभापती प्रशांत विश्वासराव देवरे, माजी सभापती विलास मोहनराव देवरे, स्व. डॉ. नानांचे सुपुत्र व नाशिक येथील उद्योजक प्रकाश कुलकर्णी, विश्वास कुलकर्णी, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त उत्तम देवरे, माजी सरपंच दिलीप देवरे, शिक्षक सुनील देवरे आणि हेमंत देवरे उपस्थित होते. त्यांनी स्वर्गीय डॉ. कुलकर्णी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी काशिनाथ देवरे होते.
यावेळी नंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन व वृक्षारोपण करण्यात आले. भारतीय जैन संघटना आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद पाटणी यांच्या हस्ते प्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवा वाघ, माजी सभापती राजेंद्र देवरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप देवरे, दीपक निकम, मिलिंद शेवाळे, शिवा देवरे, राजेंद्र देवरे, जयेश देवरे, राहुल देवरे, निंबा देवरे, उदय देवरे, उमेश देवरे, रामराव देवरे, शांताराम देवरे, रतन देवरे, भिला देवरे, संजय देवरे, भरत देवरे, बंडू देवरे, भाऊसाहेब देवरे, विश्वनाथ देवरे, सचिन देवरे, दिलीप देवरे, सचिन जाधव, कुलकर्णी परिवार आणि श्रीराम मित्रमंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमराणे येथे शिक्षणमहर्षी डॉ. नारायण गणेश कुलकर्णी यांच्या पुतळ्याचे अनावरण






















