*लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या दर्शन जाधवची राष्ट्रीय स्तरावर निवड*

 

​लासलगाव: लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी दर्शन जाधव याची उंच उडी क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
​दर्शन जाधवने १९ वर्षांखालील वयोगटात उंच उडी प्रकारात १.८८ मीटर इतकी उंच उडी मारून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सदर राज्यस्तरीय स्पर्धा डेरवण, रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडल्या.
सत्कार आणि अभिनंदनाचा वर्षाव
​दर्शनची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव संजय पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन संस्थेच्या वतीने सत्कार केला.
​यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये ईश्वरी गांगुर्डे (उंच उडी), अनुष्का मोकाटे (गोळा फेक), प्रसाद बनकर (किक बॉक्सिंग) आणि जिजामाता कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती चव्हाण (किक बॉक्सिंग) यांचा समावेश होता.
​मार्गदर्शक आणि शुभेच्छा
​यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका नीताताई पाटील, शंतनू पाटील, अभय पाटील, पुष्पाताई दरेकर, सिताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे, राजेश्वरी जाधव सरपंच टाकळी विंचूर, विलास काळे, संजय जाधव, शिवाजी जाधव, बाजीराव जाधव, वैशाली जाधव, प्राचार्य विजय वाणी, मुख्याध्यापिका शारदा केदार आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
​या विद्यार्थ्यांना रावसाहेब जाधव, जितू अहिरे, तसेच विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संदीप गंभीरे आणि चंद्रकांत नेटारे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *