शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक पाडळशिगीत येताच शेतकरी समाधानी.

पाडळशीगी अप्पर जिल्हाधिकारी श्री.हरिश धार्मिक यांनी दुपारी दोन नंतर पाडळसिंगी तलाठी सज्जा, जिल्हा परिषद शाळा सह आदी ठिकाणी भेटी दिल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर आयोजित केले होते.
यामध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा झाली शेतकऱ्यांची जिवंत सातबारा मोहीम, जातीचे व विविध दाखले वितरण, संजय गांधी /श्रावण बाळ निराधार योजना, नकाशावरील रस्ते खुले करणे, शेतकरी ओळख क्रमांक, जन्म-मृत्यू दाखले,पीएम किसान, पुरवठा विभागाशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या त्याच बरोबर सततच्या पावसाने शेतीचे झालेल्या नुकसान बाबत शेतकऱ्यांना धिर देत संवाद साधला यावेळी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे, पाडळसिंगी महसूलचे मंडळ अधिकारी सोळसे,पाडळसिंगी तलाठी सज्जा चे ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) अविनाश लांडे, ग्राम महसूल अधिकारी,आरती सुतार तलाठी सज्जा रांजणी, किरण नंनवरे, ग्रामपंचायतचे सरपंच रितेश साबळे उपसरपंच विकास चौधरी,ग्रामपंचायत ऑपरेटर गोकुळ मराठे, ग्रामपंचायत कर्मचारी भगवान शिंदे, सुंदर यादव,सेवा सोसायटीचे चेअरमन बळी आप्पा साबळे,भिष्मा घोडके,अमोल काळे, जगन साबळे, ओम बजगुडे,रोमन रुक्मानंद, रुघुनाथ दाभाडे,हनुमान शिंदे,मगन चव्हाण,नारायण भांडवलकर, यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते एकलिंगेश्वर मंदिर परिसरात सर्व गावकरी एकत्र आल्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना भिष्मा घोडके यांनी केली. अप्पर जिल्हाधिकारी यांचे स्वागत गावकऱ्यांच्या वतीने सरपंच रितेश साबळे यांनी केले तर तहसीलदार खोमणे यांचे स्वागत मंडळ अधिकारी सोळसे व तलाठी अविनाश लांडे यांनी केले यानंतर शेतकरी/नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरीश धार्मिक यांनी तहसीलदार संदीप खोमणे यांना संजय गांधी निराधार योजना संबंधित वयोवृद्धांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत असल्यामुळे पाडळसिंगी येथेच कॅम्प घेण्याबाबत कळवले तसेच पाडळसिंगी तलाठी सज्जाला महसूल सेवक (कोतवाल ) अनेक वर्षापासून नसल्याने अतिरिक्त पदभार देण्याबाबतही सूचना केल्या, ई पिक पाहणी च्या समस्या उद्भवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, सततच्या पावसाने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या, जिल्हा परिषद शाळेत जाऊन शिक्षकांना पटसंख्या व पौष्टिक आहार बाबत विचारणा करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पाडळशिगी तलाठी सज्जाची दप्तर तपासणी तसेच प्रलंबित फेरफार चा आढावा घेऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
व तलाठी अविनाश लांडे व मंडळ अधिकारी चांगले काम करत असल्याने कौतुक केले. गावकऱ्यांच्या एकी बाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *