नाशिक। आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा
नामको हॉस्पिटल आणि घ्एझ्-ण्र्झ् मध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
नाशिकमधील अग्रगण्य वैद्यकीय संस्था नामको हॉस्पिटल आणि देशातील अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस (घ्एझ्-ण्र्झ्) यांच्यात नुकताच एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
या करारान्वये घ्एझ्-ण्र्झ् संस्थेचे सर्व कर्मचारी नामको हॉस्पिटलमधील अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि दर्जेदार उपचार यांचा सुलभपणे लाभ घेऊ शकतील. यामुळे कर्मचार्यांचे आरोग्य अधिक सक्षम राखले जाणार असून संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
या उपक्रमात मानव संसाधन प्रमुख श्री. अर्पित धवन, जनरल सेक्रेटरी श्री. जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर जुंद्रे आणि डॉ. चंद्रकांत हिंगमिरे यांचे मोलाचे योगदान लाभले. त्याचप्रमाणे दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि व्यवस्थापन यांचे सहकार्यही उल्लेखनीय ठरले.
या सामंजस्य कराराबाबत नामको हॉस्पिटलचे अध्यक्ष श्री. सोहनलाल भंडारी, सेक्रेटरी श्री. शशिकांत पारख व पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले असून, ‘हा उपक्रम आमच्या हॉस्पिटलच्या सेवा-विस्ताराचा व समाजसेवेच्या वाटचालीतला महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा करार केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न राहता, नाशिकमध्ये आरोग्य क्षेत्राच्या एकूण प्रगतीस चालना देणारा ठरेल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
नामको हॉस्पिटल व’इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस चे महत्वपूर्ण करार






















