नाशिक (कल्पेश लचके )पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, फिरोदिया सभागृह येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या समारंभात स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी (नाशिक) येथील उपशिक्षक, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोसिएशन चे राष्ट्रीय सचिव, तथा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटना फेडरेशनचे राज्य समन्वयक व राष्ट्रीय हरित सेनेचे जिल्हा समन्वयक प्रदीपसिंग पाटील यांना ‘पर्यावरण गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पाटील यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक पर्यावरणीय जनजागृती पर कार्याची प्रशंसा यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.या सोहळ्याला दहा हजार एकरांहून अधिक क्षारपड जमीन सुपीक करणारे दत्त सहकारी साखर कारखाना, ता .शिरोळा (जि.कोल्हापूर) चे चेअरमन गणपत पाटील, ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया चे अध्यक्ष अमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रदीपसिंग पाटील यांचे कार्य केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता पर्यावरण जनजागृती, शालेय उपक्रमांचे प्रभावी आयोजन, हरित लष्कराचे नेतृत्व व समाजात पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करण्यावर आधारित आहे. त्यांच्या कार्याने समाजात सकारात्मक बदल घडवला असून, या पुरस्काराने त्यांच्या कार्यास अधिक बळ मिळेल, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.नुकत्याच झालेल्या नाशिक दौऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मा. सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांना पर्यावरण विभाग , प्रदूषण नियंत्रण मंडळ व एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणविषयक उपक्रमांचे सविस्तर निवेदन पाटील यांनी दिले.
(कल्पेश लचके)






















