पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. अमोल मोहळकर यांचा कर्तव्य दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आला आहे. पाटोदा शहरातील शेतकरी महादेव जाधव यांच्या गाईचा पाय मोडल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना पाटोदा आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. अमोल मोहळकर यांना समजताच तात्काळ डॉक्टर मोळकर यांनी घटनास्थळी धाव घेत योग्य उपचार सुरू करून त्या गाईचे प्राण वाचवले.गाईच्या पायाच्या गंभीर जखमेवर डॉक्टर मोहळकर यांनी आपल्या सहकारी डॉ. हरिदास शेलार आणि डॉ. ओम गोरे यांना सोबत घेऊन शेतातच तातडीने शस्त्रक्रिया केली. अनेक तास सतत चाललेल्या उपचारांमुळे गाईची प्रकृती स्थिर झाली आणि तिचे प्राण वाचले.या मनोभावातून दिसून येते की डॉ. अमोल मोहळकर केवळ मानवतेसाठीच नव्हे, तर प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमासाठीही नेहमी तत्पर असतात. शेतकरी महादेव जाधव यांनी या डॉक्टरांच्या संवेदनशीलतेचे व समर्पित प्रयत्नांचे कौतुक केले असून त्यांना मोठा आधार मिळाल्याचे सांगितले.पाटोदा तालुक्यातील ही घटना माणुसकीच्या नवीन परिभाषा मांडते. प्राण्यांच्या आरोग्यासाठी वेळ न घालवता तातडीने मदतीसाठी धावणाऱ्या डॉ. मोहळकर आणि त्यांच्या टीमचे शहरातील शेतकऱ्यांनी विशेष आभार मानले आहेत.ही घटना वैद्यकीय मदतीची तर आहेच, पण त्याहूनही अधिक माणुसकी आणि सहृदयतेची जिवंत साक्षी आहे, जी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
डॉक्टर अमोल मोहळकर यांनी योग्य उपचार केल्याने गाईला मिळाले जीवदान






















