सुधर्मा स्वामी धर्मसभा आणि आनंद दरबारात सामूहिक जपाचे अद्वितीय आयोजन
मालेगाव : साध्वी-वंदनीय उपाध्याय प्रवर डॉ. गौतम मुनिजी म.सा. आणि आगमज्ञाता वैभव मुनिजी म.सा. यांच्या सान्निध्यात, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मालेगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सवा लाख ‘लोगस्य’ सामूहिक जपानुष्ठानाने संपूर्ण मालेगाव नगरी भक्तिभावाने भारावून गेली.
जवळपास १५००हून अधिक श्रावक-श्राविकांच्या उपस्थीत, नव्याने बांधण्यात आलेल्या “सुधर्मा स्वामी धर्मसभा” आणि “आनंद दरबार” या जैन स्थानक प्रांगणात एक स्वर आणि एक तालात झालेल्या या ऐतिहासिक जपाचे वातावरण अत्यंत पावन आणि प्रभावी होते.
या पावन प्रसंगी वादिमान मर्दक दादा गुरुदेव श्री नंदलालजी म.सा. आणि मेंवाड भूषण बहुश्रुत गुरुदेव प्रतापमलजी म.सा. यांच्या पुण्यस्मृतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रीसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व युवावर्गाने मिळून परिश्रमपूर्वक या जपाचे आयोजन केले. श्री आनंद युवक मंडळ, जय आनंद ग्रुप, आनंद विहार ग्रुप, जैन संस्कार मंच, जय जिनेन्द्र ग्रुप, श्राविका मंडळ, सुशील बहु मंडळ, सुरभि संगीत मंडळ, सुमंगल ग्रुप, आनंद कन्या परिषद, गौतम निधी ग्रुप आणि कॅम्प श्री संघ यांच्या अथक प्रयत्नांचे फलित म्हणजेच आजचा अभूतपूर्व सोहळा.
गुरुदेवांनी श्री संघ मालेगावबद्दल कृतज्ञता व्यक्त करत यशस्वी जपाबद्दल समाधान आणि आशीर्वाद व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सकल जैन संघ, बाहेरगावाहून आलेले मान्यवर श्रीसंघ, तसेच अनेक कुटुंबीय आणि अतिथी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे श्रीसंघाचा उत्साह द्विगुणित झाला.
मालेगाव श्री संघ सर्व ज्ञात-अज्ञात सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि भविष्यकाळातही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो.
आपलाच
श्री संघ मालेगाव 🙏🏻






















