बीड प्रतिनिधी
बीड शहरापासून अगदी जवळच असणाऱ्या पिंपळवाडी क्षेत्रामध्ये कदमवाडी म्हणून या डोंगरपट्ट्यात ह.भ.प.श्री रामनाथ महाराज आव्हाड व ह. भ. प.सीता ताई महाराज आव्हाड यांच्या प्रेरणेतून त्यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील व तमाम महाराष्ट्रातील मुलींना वारकरी संप्रदायाची आवड निर्माण होण्यासाठी या क्षेत्रात परिपूर्ण असं ज्ञान मिळवून देण्यासाठी एक संकल्प घेऊन या परिवारांने श्री आदिशक्ती संत मुक्ताबाई अध्यात्मिक वारकरी मुलींची शिक्षण संस्था म्हणून आज पासून सुरू केली गेली याचा उद्घाटन सोहळा ह. भ. प. श्री लक्ष्मण महाराज मेंगडे बंकट स्वामी मठ नेकनूर यांच्या हस्ते व या पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील हजारोच्या भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला
या ठिकाणी या परिसरातील व इतरत्र ज्या अध्यात्मिक ज्ञानाची खरोखर आवश्यकता आहे व सांप्रदायिक क्षेत्रात मुलीचे स्थान एक चांगलं बनवून परिपूर्ण विद्या देण्याचा मानस या ठिकाणी ह भ प सीता ताई महाराज यांनी व्यक्त केला
या वेळी विलास बडगे बापू पिंपळवाडी चे माजी सरपंच अर्जुन बहिरवाल, युवराज बहिरवाल, डोके सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
श्री आदिशक्ती संत मुक्ताबाई अध्यात्मिक वारकरी मुलींची शिक्षण संस्था उद्घाटन संपन्न






















