नाशिक :आरोग्यदीप फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्यच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोक आरोग्य विशेषांक’ या आरोग्यावर आधारित विशेष प्रकाशनाचा भव्य सोहळा रविवार, २० जुलै २०२५ रोजी हॉटेल पेगासस, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला. या विशेषांकाचे मुख्य संपादक डॉ. महादेव सुरासे असून, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विशेषांकाचे प्रकाशन आमदार मा. सत्यजित तांबे (नाशिक पदवीधर) यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अॅड. नितीन ठाकरे (सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक) यांनी भूषवले.
यावेळी डॉ. संजय अपरांती (माजी पोलीस अधीक्षक व उपायुक्त, मुंबई),
डॉ. नारायण देवगावकर (प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ),
डॉक्टर राहुर येवले President of arogyadip foundation,
डॉ.राहुल पाटील मधुमेह तज्ञ
डॉ. उमेश मराठे (लॅप्रोस्कोपिक सर्जन व वंध्यत्व तज्ज्ञ)
, डॉ. निखिल भामरे (मेंदू व मणके विकार तज्ज्ञ),
डॉ. सचिन देवरे (लॅप्रोस्कोपीक, लेझर, जनरल व रोबोटिक सर्जन)
आणि डॉ. पार्थ देवगावकर (किडनी विकार तज्ज्ञ) यांची मान्यवर उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. राहुल येवले (अध्यक्ष, आरोग्यदीप फाऊंडेशन) आणि डॉ .महादेव सुरासे संस्थापक, आरोग्यदीप फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांनी विशेषांकाच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिली आणि आरोग्यविषयक यापुढील उपक्रमांची रूपरेषा मांडली.
“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि जागरूक समाज हेच तिचं खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतात,” असा विचार यावेळी बोलताना काही मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमांमध्ये दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायक व संगीतकार साहिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यदीप गीताच विशेष सादरीकरण केले.
आरोग्य विषयक अभ्यासपूर्ण लेख, वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि समाजप्रबोधनात्मक विचार मांडणाऱ्या या ‘लोक आरोग्य विशेषांक’ चे प्रकाशन हा आरोग्यदीप फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर कपिल मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे, पाहुण्यांचे व सर्व सहयोगींचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना कुलकर्णी त्यांनी केले.






















