पाटोदा (प्रतिनिधी) आष्टी मतदार संघातील पाटोदा शहरात पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानकपणे जेसीबी फिरवून घर उद्ध्वस्त करण्यात आले. या प्रकारात केवळ घरच नव्हे तर परिसरातील २५ ते ३० झाडांनाही काटेकोरपणे तोडण्यात आले, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकारामुळे पारधी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.पाटोदा प्रशासना कडून पवार कुटुंबाला कोणतीही आधीची लिखित नोटीस देण्यात आली होती का? त्या जागेवरील असलेल्या झाडांची वृक्षतोड परवानगी घेण्यात आली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट आहेत.
त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर आहे का? या संदर्भात चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. असुन समस्त पारधी समाजाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली आहे. दिव्यांग कुटुंबावर अन्याय करणार्या प्रशासनाची ही वागणूक मान्य नाही, असेही समाज बांधवांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून या प्रकरणावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. या प्रकारात मानवी हक्कांचे उल्लंघन झाले का? हे देखील तपासाचे एक महत्त्वाचे अंग ठरणार आहे.पारधी समाजाच्या न्यायासाठी आता सर्वत्र आवाज उठू लागला असून पवार कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर लवकरच पाटोदा तहसील समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पारधी समाज संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे पदाधिकारी यांनी दिला आहे
आष्टी मतदार संघातील पाटोद्यात पारधी समाजाच्या घरावर जेसीबी फिरवून संसार उध्वस्त! झाडांचीही कत्तल – चौकशीची मागणी


























