लासलगाव (आसिफ पठाण )
लासलगांव येथे भारतीय बौध्द महासभा व फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यशोधरा व रमाई महीला मंडळ यांंच्या संयुक्त विद्यमाने नालंदा बुद्ध विहार गणेश नगर येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या पवित्र वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला प्रथम तथागत भगवान् गौतम बूध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून सामुहीक वंदना घेण्यात आली भारतीय बौध्द महासभेचे नाशिक जिल्हा संस्कार उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवने, यांच्या हस्ते वर्षावास प्रारंभ ऊदघाटन झाले सदर प्रसंगी गुरुपौर्णिमा निम्मीत शालेय विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमा प्रसंगीं शिक्षक रमेश कर्डक सुरज झाल्टे,अमोल संसारे अर्चना कर्डक,आशा झाल्टे,डॉ अमोल शेजवळ यशोधरा महिला मंडळाच्या आरतीताई भालेराव यांचा सत्कार करण्यात आला
लासलगांव येथील नालंदा बुद्ध विहार येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या वर्षावास कालावधि मध्ये तथागत भगवान गौतम बूध्द, डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांचे जिवन चरित्रावर तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ, मिलींद प्रश्न भारतीय संविधान आशा विवीध विषयांवर परिपुर्ण पणे मार्गदर्शन वर्षावास कालावधि मध्ये भारतीय बौध्द महसभेच्या वतीने केले जाईल त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकाच्या वतीने आव्हान करण्यात आले
कार्यक्रमाला लासलगांचे ऊपसरपंच रामनाथ शेजवळ, अशोक गायकवाड़, मनोहर आहिरे,साहेबराव केदारे, प्रकाश वामन संसारे, भास्कर शेजवळ, डॉ चारुदत्त आहिरे,राजेंद्र शेजवळ, विठ्ठल निळे निलेश निळे, दिपक संसारे, सोनु शेजवळ, शाम साळवे, संतोष गांगुर्ड, आंनदा केदारे, आनंद चाबुकस्वर, नाना बनसोडे दादाजी बागूल,विशाल एळींजे, यशोधरा व रमाई महीला मंडळाच्या आरतीताई भालेराव माजी संरपंच संगीता शेजवळ, सुशिला शेजवळ, ज्योती शंभरकर माया केदारे, माया शेजवळ, रमणताई शेजवळ, वैशाली शेजवळ मणीषा शेजवळ, प्रीती शेजवळ, रेखा गायकवाड़ संध्या निरभवने संगीता शेजवळ, कल्पना एळींजे,अर्चना कर्डक,आशा झाल्टे,आदी धम्म बांधव मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते कार्य कार्यक्रमाच्या शेवटी भव्य खिरदान कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन भारतीय बौध्द महसभा निफाड तालुका शाखा अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले तर अभार फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे मनोज शेजवळ यांनी मानले
लासलगांव येथे वर्षावास प्रारंभ व विध्यार्थ्यी गुणगौरव सोहळा संपन्न


























