नंदुरबार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन (महाराष्ट्र) आणि टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन (नंदुरबार) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित २४ व्या राज्य अजिंक्यपद १९ वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिक ग्रामीण संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात नाशिक ग्रामीण संघाने लक्षवेधी प्रदर्शन केले. समीक्षा रायते हिने महत्त्वपूर्ण चौकार मारले. समृद्धी रायते, वैष्णवी पडोळे आणि पायल गारे यांनीही उत्कृष्ट फलंदाजी करून संघाला बळ दिले. सामन्याच्या शेवटी १ चेंडूत ११ धावांची आवश्यकता असताना, गोलंदाज स्नेहल शिंदे हिने अंतिम चेंडू अचूक टाकत नाशिक संघाला विजय मिळवून दिला आणि संघाचा तिसरा क्रमांक निश्चित केला.
पदक विजेत्या नाशिक ग्रामीण संघाचे नेतृत्व सानिका गोराने हिने केले. संघात सानिका रायते, पूर्वी कान्हे, तन्वी कान्हे, अनुष्का वाघ, पायल जाधव, अमिषा चौधरी, तनुजा रायते, आणि महेक पठाण या खेळाडूंनी प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले.
या यशस्वी कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव मुकुंद झनकर आणि सहसचिव सागर झनकर यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी रानवड सहकारी साखर कारखान्याचे एम.डी. शेलार साहेब, आर. डी. जाधव, प्रवीण वाघ, रावसाहेब जाधव, आणि राहुल वाघ यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.
खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक प्रदीप राठोड, राहुल नवले, अजय कंडारे, मयूर गुरव, विश्वनाथ चव्हाण, योगेश्वर जेउघाले, आणि प्रतीक कडाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
*नंदुरबार येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक ग्रामीण संघाला तिसरा क्रमांक*

























