चांदवड – (कीर्ती गुजराथी) –
येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका वैशाली भामरे यांनी गाईडचे प्रगत प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स कार्यालय नाशिक येथे आयोजित गाईड कॅप्टन प्रगत प्रशिक्षण दि. १ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडले. या प्रशिक्षणात उपशिक्षिका वैशाली भामरे यांनी सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानिमित्त उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा ओस्तवाल, क्रीडा विभाग प्रमुख दत्ता ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते वैशाली भामरे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांचे संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
——
फोटो- उपशिक्षीका वैशाली भामरे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविताना उपप्राचार्य देवेंद्रराज जैन व शिक्षक.

























