चांदवड (कीर्ती गुजराथी) –
येथील श्रीमान पी. डी. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उर्धुळ येथील विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत
ऋषिकेश तासकर व सौरभ पवार यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी त्यांनी ड्रोनची संपूर्ण माहिती स्वयंसेवकांना सांगून ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात कसा उपयोग केला जात आहे, फवारणी यंत्र म्हणून आपल्या शेतीचे संवर्धन व संरक्षण कसे करायचे, कृषी क्षेत्राचा विकास कसा करायचा, शहराकडे जाण्याऐवजी ग्रामीण भागातच उद्योग व व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून स्वयंसेवकांना दिली. या तंत्रज्ञानाच्या अनुभवातून विद्यार्थी भारावून गेले. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ड्रोन तंत्रज्ञान हे भविष्यातील उड्डाण आहे, या तंत्रज्ञानाचा वापर भावी जीवनात करा असे मत ऋषिकेश तासकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य हांडगे या स्वयंसेवकाने केले तर प्रशांत नवले यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अधिकारी जी. आर. गांगुर्डे व एस. डी. जगताप, सर्वेश खुटे, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.
——–


























