आई हि जन्म देते तसे संविधान हे माणसाला माणूसपण देऊन जीवन घडवणारी आईच आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि लोकशाहीची मूल्ये आपल्याला संविधानाने जन्मताच दिल्यामुळे आज विविधतेने नटलेला प्रत्येक भारतीय सुखी समाधानाने जीवन जगत आहे. त्यामुळे साहित्यिकांनी आईप्रमाणेच संविधानावरसुद्धा लिहिले पाहिजे. असे विचार अष्टुळ यांनी मांडले.
साहित्य सम्राट पुणे संस्थेने संविधान दिनानिमित्त संविधान जागर मोहीम या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन २१२ वे कवी संमेलन कविता संविधानाच्या या विषयावर कमला नेहरू पार्क एरंडवणा पुणे येथे आयोजित केले होते.
मंचावर कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी बाबा (विलास) ठाकूर, प्र.पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सदानंद माळी (सांगली), ज्येष्ठ गजलकार प्यासा अंजुम (जम्मू), हृदय प्रकाश (मध्य प्रदेश), गझलकार मसूद पटेल (दुबई रिटर्न ), प्राचार्य सतीश देवपूरकर आणि संस्थेचे संस्थापक विनोद अष्टुळ उपस्थित होते.
विचारपिठावरील मान्यवरांचा आणि जम्मू येथील सुप्रसिद्ध गझलकार प्यासा अंजुम यांचा सन्मानचिन्ह, शाल आणि स्मरणिका देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बाबा ठाकूर यांचा वाढदिवससुद्धा साजरा करण्यात आला.
कविता संविधानाच्या या विषयावर व्यक्त होताना पस्तीस कवी, कवयित्री आणि गझलकार यांनी आपल्या अप्रतिम रचना सादर करून संविधान दिन मोठ्या उत्साहाने वैचारिक विचारातून साजरा केला. यामध्ये संदीप परदेशी, प्रतिमा काळे, राजश्री मराठे, मनीषा सराफ, शिवाजी उराडे, मसूद पटेल, ॲड.अनिता देशमुख, ॲड.संध्या गोळे, सदानंद माळी, नंदकिशोर गावडे, आर.देवगडे, हृदय प्रकाश, दत्तात्रय मोरे, एम.महाले, योगिता कोठेकर, सतीश देवपूरकर, प्रा.बी चव्हाण, प्यासा अंजुम, प्रा.आनंद महाजन, श्रीकांत जगताप, किरण प्रकाश, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, प्रा.शंकर लोखंडे, विनोद अष्टुळ आणि बाबा ठाकूर या सर्वांनी आपल्या बहाररदार काव्यरचनांनी कमला नेहरू पार्क मधील रसिकांची मने जिंकली.
कवी संमेलनाचे प्रास्ताविक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर आभार किशोर टिळेकर यांनी व्यक्त केले.
संविधान हे माणसाला जीवन देणारी आई – कवी. विनोद अष्टुळ


























