लासलगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लासलगाव येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून, रक्तदानामुळे अनेकांचा जीव वाचवते, त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान केले पाहिजे.असे या वेळी महांमत्री भाजपा नाशिक जिल्हा ग्रामीण सुवर्णा जगताप
यांनी सांगितले .
प.पू.भगरीबाबा मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी सर्व रक्तदात्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबिराला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचासह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती
भाजपा लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे यांनी दिली.
या प्रसंगी सुवर्णाताई जगताप , लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे , शंतनु पाटिल , उत्तम नागरे , शेखर होळकर, योगेशजी पाटिल , राजाभाउ चाफेकर , राजुभाऊ राणा , वाल्मिकराव गायकवाड , अमोल थोरे , गणेश निकम गणेश फड , कैलास सोनवणे , मनिष चोपडा , दत्तुलाल शर्मा ,निलेश लचके, निलेश जगताप , युवराज पाटील , डाॅ.संगिता सुरसे ,सुनिल नेवगे ,राजुभाउ सुरसे, कल्याण होळकर , धनंजय वाघचौरे , राजा राजोडे , ओम चव्हाण , गोरख गांगुर्डै ,आदी उपस्थित होते.

























