निफाड ( वार्ताहर )
निफाड येथील न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान, गणित, भाषा व कला या विषयावरील उपकरणे व साहित्याचे संयुक्त प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
विद्यालयातील तिसरी पासून नववी पर्यंतच्या 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात आपला सक्रिय सहभाग नोंदवीत तब्बल 185 उपकरणे व साहित्य प्रदर्शित केले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्याचबरोबर इतरही विषयांमध्ये गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने विज्ञान गणित भाषा व हस्तकला कलाकृती यांच्या संयुक्त प्रदर्शनाचे विद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलेले होते न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळाचे मुख्य विश्वस्थ वि. दा. व्यवहारे, विश्वस्त सर्वश्री रतन तात्या वडघुले, एडवोकेट दिलीप वाघावकर, विश्वास पाटील कराड, मधुकर राऊत, विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पल्लवी सानप, मनीषा गुजराती, मालती वाघावकर आदींनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
गणित आणि भूमितीतील विविध संकल्पना स्पष्ट करणारे मॅच पार्क, जॉमेट्री पार्क, विज्ञान आणि पर्यावरण यांचा मेळ घालणारे वायू प्रदूषक नियंत्रक सौर ऊर्जा प्रकल्प सेंद्रिय शेती तसेच विविध भाषांचे व्याकरण आदी विषयांवरील आकर्षक प्रतिकृती व साहित्य या प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते. विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वैनतेय इंग्लिश स्कूलमध्ये; वैविध्यपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन.


























