चांदवड (कीर्ती गुजराथी)
मोबाईल परत मागीतल्याच्या कारणावरुन रेडगाव शिवारात एकास मारहाण केल्याप्रकरणी चांदवड पोलीसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रेडगाव येथील मंदा आत्माराम काळे (६०) यांनी चांदवड पोलीसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा राहुल हा शेतातील गव्हाला पाणी देत असताना आदित्य संजय शिंदे व सचिन वाघ (पूर्ण नाव माहित नाही) दोघे रा. साळसाणे हे तेथे आले असता त्यांना राहुल याने ‘माझा घेतलेला मोबाईल परत दे’ असे बोलण्याचा राग आल्याने त्यांनी राहुल यास लाथाबुक्क्यांनी पोटावर, छातीवर मारहाण करुन दुखापत केली तसेच शिवीगाळ करुन ‘तुझा बेत पाहतो’ अशी दमदाटी केल्याची फिर्याद दिली. यावरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
—–


























