चांदवड (कीर्ती गुजराथी)
येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील गोई पुलाजवळ दुचाकी स्लीप होऊन ३७ वर्षीय दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विश्वास आनंदा पाटील (३७, रा. मंदाने ता. शहादा जि. नंदुरबार) हे दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एचएफ डीलक्स दुचाकीवर (क्र. एमएच १५ केएम ९८९५) महामार्गाने मालेगाव बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असताना चांदवड जवळील गोईपुलाजवळ त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्यातील हेल्मेट डोक्यातून निघून रोडवर डोके आदळून रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नीलेश शांताराम पाटील (रा. गोंदुर ता. जि. धुळे) यांनी चांदवड पोलीसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
——


























