पाटोदा (गणेश शेवाळे)
पाटोदा नगरपंचायत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावरच चालत आहे. परिणामी येथील जनतेला वेगवेगळ्या कामांसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा,रस्ते दुरुस्ती, अशा महत्वाच्या कामांकडे योग्य वेळी लक्ष न गेल्याने नागरिकांमध्ये असंतोषाची लाट आहे.स्थानिक नागरिकाचे म्हणणे आहे की प्रभारी अधिकाऱ्यांकडे इतर ठिकाणची जबाबदारीही असल्याने नगरपंचायतीच्या कामकाजाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सोप्या कामांसाठीसुद्धा नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात.यामुळे
नागरिकांचे एकच प्रश्न आहे की पाटोदा नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी कधी मिळणार? विकास कामे, शासकीय योजना, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी सक्षम व पूर्णवेळ मुख्याधिकारी आवश्यक असल्याची मागणी सर्व जनते कडून होत आहे.
नगरपंचायत प्रभारी अधिकाऱ्यामुळे जनता बेजार; पाटोदा नगरपंचायतीला हक्काचा मुख्याधिकारी कधी मिळणार?






















