मलकापूर येथे राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

भुसावळ. (गोपाळकुमार कळसकर)

भुसावळ : डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५’ कार्यक्रम मलकापूर येथील भातृ मंडळ येथे नुकताच गुरुवार ( ५ नोव्हेंबर २०२५) ला आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ ९००१- २०१५ प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते .त्यावेळी ७६८ प्रस्तावांपैकी निवड करून १५६ मान्यवरांना राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या ११८ शिक्षकांचा सुद्धा नॅशनल आयकॉन अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज) , कार्यक्रमाचे उद्घाटक ब्रह्मानंदजी जाधव मुख्य संपादक दैनिक महाभुमी, तर प्रमुख पाहुणे संजयजी काजळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ,धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, बंडूभाऊ चवरे उद्योजक, बाळासाहेब दामोदर उद्योजक , राजू वैद्य विभागीय व्यवस्थापक, दिलीप आढाव (प्राचार्य विद्या विकास विद्यालय ) डॉ. प्रदीप गायकी वाहतूक नियंत्रक नांदुरा, अविनाश बोरले सर प्राचार्य नूतन विद्यालय, हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण,सामाजिक ,राजकीय, कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार राष्ट्र गौरव २०२५ हा पुरस्कार देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गंणगे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय टप, प्रा. प्रकाश थाटे, सुधाकर तायडे, प्रमोद हिवराळे, मयूर लड्डा, कैलास काळे, अनिल गोठी, शेख निसार , शेख ताहेर , विनायक तळेकर, भाऊराव व्यवहारे , सुनील देशमुख, अमोल वानखेडे, किशोर सोनवणे, विलास तायडे, यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *