चितेगांव येथील विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान.

 

लासलगाव (आसिफ पठाण):- निफाड तालुक्यातील चितेगांव येथे कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास नाशिक पूर्व वनविभागाचे आधुनिक बचाव पथक निफाड व ए.आर.ई ए.एस.फाउंडेशन संस्था तसेच निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्था यांच्या मदतीने सुरक्षित रित्या बचाव कार्य करण्यात आले.
या बद्दल अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री च्या ८ वाजेच्या सुमारास चितेगांव येथील सुभाष साहेबराव गाडे यांच्या घराजवळील विहिरी जवळ बिबट्या कुत्र्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला असता, कुत्रा स्वतः चा जीव वाचवत पळाला व त्याचा पाठलाग करत असतांना जवळच असलेल्या विहिरीत बिबट्या विहिरीत पडले. ही गोष्ट सुभाष साहेबराव गाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीस पाटील चितेगांव राहुल दळवी व सरपंच सुभाष गाडे यांना कळवले तसेच ए आर इ ए एस फाउंडेशन चे संचालक व वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे यांना फोन वरून बातमी दिली व वनविभागाशी संपर्क केला.
घटनेची माहिती मिळताच नाशिक पुर्व वनविभागा चे उपवनसंरक्षक .राकेश सेपट, सहायक वन संरक्षक मनमाड शिवाजी सहाणे, येवला वनपरीक्षेत्र अधिकारी .राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन परिक्षेत्राचे निफाड येथील आधुनिक बचाव पथक व ए.आर.ई ए.एस.फाउंडेशन संस्थेचे सदस्य व निर्भय संचार फाउंडेशन संचलित वन राजा संस्थेचे सदस्य यांनी घटनास्थळी पोहचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला. तत्पूर्वी बिबट्या ने विहिरीत मोटार च्या पाईप चा आधार घेऊन स्वतः ला पाण्यात वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले होते.विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबटया ला जेरबंद करून सुरक्षित रित्या बाहेर काढून जीवदान दिले.पुढील कार्यवाही साठी बिबटया ला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले.बचाव कार्या नंतर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करण्यात येऊन बिबट्या बाबतचे माहिती पत्रक वाटप करण्यात आले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे,वनपाल जयराम शिरसाठ, वनरक्षक विजय दोदें आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारत माळी, विजय माळी, शरद चांदोरे, सागर दुशिंग, सादिक शेख, वैभव दौंड, रितेश निहारे ,मयूर गांगुर्डे, ज्ञानेश्वर पवार, काशिनाथ माळी, आणि ए.आर.ई ए.एस.फाउंडेशन चे वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे,सुशांत रणशूर, हेमंत वानले, मोहन जगताप,पवन नागपुरे,मंगेश चारोस्कर, करण पवार,योगेश शेजवळ, राजेश शेजवळ,निर्भय संचार फाउंडेशनचे शरद जाधव, शंभू जाधव, निलेश उल्लारे यांनी बचाव कार्य केले.सरपंच सुभाष गाडे, ग्रामविकास अधिकारी  विजया वायकर,तलाठी शेखर पाटील, पोलीस पाटील राहुल दळवी व चितेगांव ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *