भोकरदन (एकनाथ पांडव)
आन्वा येथे राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी नाभिक समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी नाभिक समाज बांधवांनी एकत्रितपणे मेहनत घेतली.
यावेळी नाभिक समाज अध्यक्ष सुभाष घोडके यांनी सांगितले की, “राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराजांचे कार्य हे समाजाला एकता, प्रेम व सत्याचा मार्ग दाखवणारे आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त समाजाने एकत्र येऊन त्यांना अभिवादन करणे हीच खरी श्रद्धांजली आहे.”
पुण्यतिथी सोहळ्यासाठी नाभिक समाज अध्यक्ष सुभाष घोडके यांच्यासह शालीकराम घोडके, भगवान घोडके, देविदास घोडके, आनंदा घोडके, सोमीनाथ घोडके, गजानन घोडके, दीपक घोडके, विठ्ठल घोडके, कृष्णा घोडके, मनोहर घोडके, भागवत घोडके, अमोल घोडके आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्वा येथे राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी






















