विल्होली च्या जान्हवी साहिल बाफना 15 उपवास चा सांगता समारंभ

करुणामूर्ति, पैसठिया छंद आराधिका, आत्मसाधिका, उपप्रर्वतनी ▫️प.पू. किरणसुधाजी म.सा. तप तेजस्विनी ▫️प.पू. विशालप्रभाजी म.सा. _आदि साध्वी यानी 15 उपवास यशस्वी केल्याबद्दल सौं जान्हवी साहिल बाफना यांना आशीर्वाद देताना दिसत आहे

नाशिक (वार्ताहर)

विल्होली येथील श्री साहील सुशीलजी बाफना यांची धर्मपत्नी सौ. जान्हवी बाफना यांनी जैन धर्मातील १५ दिवस निरंकार तपस्या (उपवास) प.पू. किरणसुधाजी म.सा. यांच्या प्रेरणेने व आशिर्वादाने केले, अर्धमासखमण ची पचकावनी आर. के. जैन स्थानकात झाली, या कार्यक्रमास श्री सुशीलजी, सुरेंद्रजी आदि बाफना परिवार व परळी वैजनाथ येथील डॉ .पूनमचंद कांकरीया, कवित्ता कांकरिया सुभाष धिया, मंगला घिया,रुपचंद बागमार, जे.सी. भंडारी इत्यादि उपस्थित होते.

या तपस्ये निमित्त रविवार 3/८/२५ रोजी जैन मंदीर विल्होळी येथे सकाळी ९ ते १२ वाजे पर्थत भक्ति गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्वांनी उपस्थित रहावे अशी विनंती विल्होळी जैन स्थानकाचे ट्रस्टी श्री सुशिलजी बाफना यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *