पिंपळगाव रेणुकाईच्या मिरची बाजारात दररोज होते तब्बल पाच कोटींची उलाढाल

 

मिरची मुळे अर्थकारण बदलले दररोज हजार टनाची आवक, शेतकऱ्यांना मिळतोय चांगला भाव
पिंपळगाव रेणुकाई:- (महेंद्र बेराड)
मिरचीचे आगार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजारात सध्या हिरव्या मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू आहे. सुरूवातीला चारशे टनाची आवक असणाऱ्या मिरची बाजारात सध्या मागील दोन आठवड्यांपासून एक हजार टन मिरची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती येथील व्यापाऱ्याने दिली आहे. सध्या मिरचीला
बाजारात जवळजवळ सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खेळू लागला आहे. हिरव्या मिरचीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पादन हाती लागत नसल्याने मागील २० वर्षांपासून पारंपरिक पिकांना फाटा देत मिरची पिकाकडे वळला आहे. तसेच मिरचीतून दरवर्षी चांगले उत्पन्न हाती लागत असल्याने या भागातील मिरची उत्पादक शेतकरी देखील वाढले असून दिवसेंदिवस मिरची लागवडीत वाढ होत आहे. यंदा देखील परिसरातील शेतकऱ्यांनी जवळजवळ अडीच हजार हेक्टरवर मिरची पिकाची लागवड केली
पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी अशा प्रकारे मिरची तोड करुन ठेवत आहेत.
सोयी-सुविधांकडे लक्ष
येथील मिरची बाजार येथील बाजार समितीत भरतो. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाजार समितीकडे महसूल गोळा देखील होत आहे. शेतकरीव व्यापारी यांना बाजार समितीकडून सोयी-सुविधा दिल्या जात आहेत.. शेतकऱ्यांची गैरसोय, फसवणूक होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. संतोष ढाले, सचिव, बाजार समिती
आहे. मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात लागवड केलेली मिरची बाजारात विक्रीसाठी येऊ लागली आहे. हिरव्या मिरचीला सध्या जवळजवळ बाजारात साडे सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे. मागील आठवड्यात भावाने नऊ हजार पार केले होते. मात्र आता आवक
पिंपळगाची मिरची या ठिकाणी जातेय विक्रीसाठी
पिंपळगाव रेणुकाई येथील हिरवी मिरची सध्या मुंबई, वाशी, पुणे, सुरत, नागपूर, दिल्ली, दुबई, बांगलादेश, हैदराबाद, लखनौ, पंजाब, छत्तीसगढ, अजमगढ, बनारस, भंडारा, जबलपूर, शिवनी, जोधपूर, फैजाबाद, खलीलाबाद आदी ठिकाणी विक्रीसाठी जात आहे.
वाढल्याने भावात दोन ते अडीच हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळते. सध्या बाजारात जवळजवळ पंचवीस ते तीस व्यापाऱ्यांकडून शेकडो शेतकऱ्यांची शिमला, तेजाफौर, शार्क वन, तलवार, ईंगल, आरमार, नेजा, पिकेटोर, जेव्लरी, पकोडा, आदी विविध प्रजातीची एक हजार टन मिरची
चार लाख रुपये उत्पन्न
मोठा खर्च करीत चार एकर मिरची लागवड केली. मागील महिनाभरात चार लाख रुपयांची मिरची विकली. त्यामुळे सर्वांची उसनवारी फेडली. आणखी तीन लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे. मिरचीमुळे लोकांचे आर्थिक ओझे हलके होण्यास मोठी मदत मिळाली असल्याचे पारध येथील शेतकरी हरिभाऊ बेराड यांनी सांगितले.
खरेदी केली जात आहे. मिरचीच्या माध्यमातून जवळजवळ बाजारात दररोज पाच कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. या ठिकाणी खान्देश, विदर्भातील देखील मिरची विक्रीसाठी येत आहे. दररोज जवळजवळ लहानमोठ्या १५० गाड्या मिरची लोड होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *