देशाच्या सर्वांगीण पायाभूत विकासासाठी संकल्पपूर्वक आणि झपाट्याने काम करणाऱ्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर झाला आहे, ही एक गौरवाची बाब आहे.
देशाच्या रस्ते व पायाभूत विकासामध्ये त्यांनी केलेले कार्य दूरदृष्टीपूर्ण, परिणामकारक आणि प्रेरणादायी आहे. त्यांचे कर्तृत्व नेहमीच ‘विकसित भारत’ या संकल्पनेला भक्कम आधार देते.
या निवडीसाठी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे आभार आणि मा. नितीनजी गडकरी यांचे मन:पूर्वक अभिनंदन!






















