उमराणे (विनोद पाटणी)। णमोकार तीर्थ येथे येऊन मला खूप आनंद झाला राष्ट्रसंत आचार्य श्रीं देवनंदीजी महाराज यांचे दर्शन झाले, नाशिक जिल्ह्यात भव्य दिव्य णमोकार तीर्थ पाहून मनअति प्रसन्न झाले दोन वर्षानंतर उशिरा मला हे भाग्य मिळाले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी णमोकार तीर्थ येथे केले.
पंचकल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आगमन झाले, याप्रसंगी झालेल्या णमोकार ट्रस्टतर्फे सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार्या भव्य पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, तीर्थाचा अ वर्ग गटात समावेश व्हावा यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री, जिल्ह्याचे मंत्री यांची लवकरच भेट घेऊन तीर्थावर रस्ते,पाणी ,विद्युतपुरवठा,आरोग्यसुविधा, सुरक्षा व्यवस्था, अग्निशामक, बसस्टॉप बससुविधा आदी स्थायी व अस्थाई सुविधा चा प्रस्ताव लवकरच सादर करून कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन पूर्ण मदत करेल असे सांगितले
प्रास्ताविक बालब्रह्मचारी वैशालीदिदि यांनी केले आचार्य श्री देवनंदिजी महाराज यांचे णमोकार तीर्थ चे व पंचकल्याण कार्यक्रमाचे महत्त्व या विषयावर प्रवचन झाले, ग्लोबल महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस लोहाडे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून णमोकार तीर्थ व पंचकल्याणक कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली,मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला,णमोकार तीर्थ ट्रस्टी भूषण कासलीवाल,यांची भाषणे झालीत ,कार्यक्रमास प्रांत कैलास कडलग,तहसीलदार मंदार कुलकर्णी ,ट्रस्टी पवन पाटणी, विजय लोहाडे, डॉ. अतुल जैन, प्रचार प्रसार संयोजक विनोद पाटणी, वर्धमान पांडे,पुनम संचेती सोनल दगडे,अंकित संचेती इंजि. मयूर जैन, चांदवड तालुक्यातील शासकीय व पोलीस अधिकारी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
णमोकार तीर्थावर होणार्या पंचकल्याणक महोत्सवासाठी सर्वतोपरी मदत: जिल्हाधिकारी जलज शर्मा






















