नवकार महामंत्र हा विश्वमंत्र बनावा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.; १.२५ कोटी नवकार महामंत्राचे उच्चारण पुणे करानी करून दाखविले

‘आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. आज सव्वा करोड नवकार महामंत्राचे अनुष्ठान पुणेकरांनी केले आहे. हा नवकार महामंत्र विश्वमंत्र बनावा,’ असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले. ‘आज नवकार महामंत्राच्या ध्वनितरंगांमुळे तुमच्या तन, मन आणि चेतना हे सारे तरंगित झालेले आहे. आज सोहळा अनोखा आहे आणि असे भव्य कार्य फक्त पुण्यातच होऊ शकते,’ असे गौरवोद्गार प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी काढले.
परिवर्तन चातुर्मास २०२५ मध्ये आज हजारो जैन परिवारांनी एकत्र येत नवकार महामंत्राचे अनुष्ठान केले आणि सव्वा कोटी महामंत्राचे उच्चारण करून इतिहास घडवला. त्या विषयी परमानंद व्यक्त करून प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, हे भव्य कार्य पुणेच दाखवू शकते. आज जी आस्था आपण दाखवली आहे ती विश्वाचा आस्था बनावी. विश्वाचे नंदनवन करायचे असेल तर नवकार महामंत्र हा एकच मंत्र आहे.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, जगातील सर्व वादविवाद हे व्यक्तीकेंद्रित आहेत. परंतु नवकार महामंत्र असा महामंत्र आहे जिथे व्यक्तीची चर्चाच नाही. तर गुणात्मकतेची व गुणांची चर्चा आहे. संप्रदाय, परंपरा यांची कशाचीही चर्चा नाही. विश्वकल्याणाचा विचार आहे. त्यामुळे गुरुदेव जन्मोत्सवाचे एक अनोखे अनुष्ठान संपन्न झाले याचा मला आनंद आहे.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, आपल्याला जे श्रेष्ठ बनवतात त्या अरिहंतांना आपण वंदन करुया. जे सिद्धीचे वरदान देताना त्या सिद्धांना अभिवादन करू या, मंगलकारी जीवनशैली शिकवतात त्या आचार्यांना वंदन करुया, विश्वकल्याणकारी तत्व समजावून देतात त्या उपाध्याय भगवंतांना वंदन करुया या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुना गौतमलब्दी फौंडेशनचे कार्यकर्ते आणि आदिनाथ सोसायटी श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी यांचे प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *