लखमापूर (प्रतिनिधी) – – श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लखमापूर येथे आयोजित समाधान शिबिरामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आहे .या शिबिराच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी चे प्रांताधिकारी डॉ.अप्पासाहेब शिंदे होते.
अध्यक्ष मनोगतात उपविभागीय अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे म्हणाले की शिबिराचा उद्देश म्हणजे शासनाच्या विविध योजना लाभ लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवणे हा प्रमुख हेतू असून या उपक्रमातून नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न एकाच ठिकाणी सोडवले जातात त्यांना वेळेत प्रभावी सेवा मिळत आहे.तसेच यातून विविध खात्यांच्या समन्वयातून सेवा मिळत असून नागरिकांच्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यासाठी आम्ही सतत कटिबद्ध आहोत. महसूल प्रशासनातील दैनंदिन समस्या,दाखले,विविध योजनांचा लाभ सरळपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.यावेळी दीपप्रज्वलन,वृक्षारोपण, तसेच विविध स्तरातील दाखले यावेळी मान्यवरांचे शुभ हस्ते देण्यात आले,करंजवण येथील अंध महिलेला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाल्याने प्रांत अधिकारी शिंदे साहेब, यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी लखमापूर मंडळ अंतर्गत येणार्या गावांचे ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी,समस्त गावचे आजी ,माजी सरपंच,उपसरपंच,आरोग्य विभाग ,अंगणवाडी कर्मचारी,कृषी विभाग,कादवा विद्यालय, जि.प.मराठी शाळा,ग्रामपंचायत ,तलाठी कार्यालय कर्मचारी आदी सर्वांनी यांनी हे शिबिर यशस्वितेसाठी प्रयत्न केले.शेवटी ‘गरजा महाराष्ट्र माझा’ या राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास नेत्रदीपक अशी उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे . सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले.






















