लासलगाव (आसिफ पठाण)
काकासाहेबनगर महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन प्रत्येकात काही न काही कोशल्य दडलेले असतात. आपण ते शोधायला हवे. आपल्यातल्या कौशल्याचा शोध घेऊन त्यांचा विकास घडवून आणल्यास आपल्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल घडून येतोच शिवाय स्वत:बरोबरच समजाच्या प्रगतीला हातभार लावला जातो. बऱ्याचदा संधी आपला दरवाजा ठोठावत येते अशा संधीला जाऊ न देता त्या संधीचे सुवर्णसंधीत कसे रूपांतर होईल हे आपण पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्यातल्या गुणांना ओळखणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महिंद्रा प्राईड संस्थेचे प्रशिक्षक अश्विनी टिळक यांनी केले.
के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित, के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय काकासाहेबनगर महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व महिंद्रा प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांच्या कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचे समन्वयक डॉ. पी. के. शहाबादकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिस्त, ज्ञान, कठोर मेहनत, सकारात्मक दृष्टीकोन या तीन गोष्टी तुम्हाला यशस्वी करतील. असे विद्यार्थिनींना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुनिता शिरसाठ यांनी केले. अतिथी परिचय डॉ. अरुण ठोके व आभार प्रदर्शन प्रा. काजल वाघ यांनी केले.
कार्यक्रमास आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. मिलिंद पवार, प्रा. शीतल जगताप, , प्रा. वैशाली शिंदे , प्रा. मुक्ता मोरे, डॉ. प्रतिभा बाहेकर, प्रा. मधुकर आहेर, प्रा. स्मिता बनकर, डॉ. भावना पौळ, प्रा. निलेश आहेर, प्रा, बाळकृष्ण फडे, प्रा. भारती कुशारे, प्रा. अर्चना ताकाटे, प्रा. जयश्री कापडी, प्रा. कविता कोल्हे, प्रा. वेदिका महाले, प्रा. पल्लवी कदम, सोनाली शिंदे, प्रा आदी प्राध्यापक , प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.


























