महाराष्ट्रात प्रथमच भा ज पा राष्ट्रवादी शिवसेना नासिक विकासा करिता बैठक

ङम न पा निवडणुकीत आघाडी एकत्र लढण्याची शक्यतत्ङमहाराष्ट्रात प्रथमच भा ज पा राष्ट्रवादी शिवसेना नासिक विकासा करिता बैठक
नाशिक : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार जनताभिमुख कामे करत आहे. सरकार जसे समन्वयाने काम करते असेच काम तिन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे आणि शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी व्यक्त केला. तिन्ही पक्षांच्या शहराध्यांची समन्वय बैठक रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात संपन्न झाली.
महायुतीच्या घटक पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात स्थानिक पातळीवरही समन्वय आणि सुसंवाद असावा यासाठीच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांची एकत्रित समन्वय बैठक रविवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारकडून होणार्‍या विकास कामांची, शासन निर्णयांची माहिती जन्मसामान्यांपर्यंत पोहचविणे, नाशिक मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विकास कामे जलद गतीने होण्यासाठी तिन्ही पक्षांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे, स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय आणि सुसंवाद वाढविणे याविषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे आणि शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीत लढण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. स्वतंत्र लढण्याचा विचार झाला तरी महायुतीला सत्ता मिळविण्यासाठीच प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी तिघांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *