धाराशिव : (प्रतिनिधी सचिन लोमटे )-भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला बळ देण्याच्या दृष्टीने दोन नव्या मंडळाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या. धाराशिव शहर मंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे नियुक्ती होताच भाजपा महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगडे मॅडम, जि.प. माजी सदस्या, अंजलीताई बेताळे, प्रदेश कार्यकारणी सदस्या मनीषाताई केंद्रे,अनिताताई शशिकला मुंडे तोडकर,आशाताई लांडगे,तुगांव येथील सचिन लोमटे, कोंड येथील राहुल जाधव यांनी भेटून सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमित शिंदे हे यापूर्वी धाराशिव नगरपरिषदेचे अध्यक्ष राहिले असून, त्यांना प्रशासनाचा अनुभव व संघटन
कौशल्य आहे. त्यांनी सातत्याने पक्ष कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांचा या निवडी मुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या संघटनात नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
भाजपच्या धाराशिव शहर अध्यक्षपदी अमित शिंदे यांच्या निवडीबद्दल सत्कार






















