मालव केशरी पू. श्री. सौभाग्यमलजी म.सा. यांची ४१ वी पुण्यतिथी तप-त्यागाने आणि उल्हासात साजरी

 

लासलगाव वृत्तसेवा -चातुर्मासानिमित्त लासलगाव येथील जैन स्थानकात पू. श्री सौभाग्यमलजी म.सा. यांची ४१ वी पुण्यतिथी भक्तिभाव आणि तपोभावनेने साजरी करण्यात आली. या पवित्र प्रसंगी बाल ब्रह्मचारी मधुर व्याख्याते पू. श्री चेतनाश्रीजी आणि बाल ब्रह्मचारी मधुर गायक पू. श्री महिमाश्रीजी यांच्या प्रेरणादायी सान्निध्यात भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या निमित्ताने १२५ जणांनी आयबील तपाची आराधना केली. आशिष मनोज आबड यांनी १९ उपवास, सौ. रिया चोरडिया यांचे ११ उपवास, वर्धमान आबड यांचे ८ उपवास, श्वेता चोरडिया आणि दर्शन लुणावत यांचे ५ उपवास केले तर १० ते १२ जणांनी ३ उपवास केले.

ही सर्व तप साधना पू. श्री सौभाग्यमलजी म.सा. यांच्या स्मृतींना साक्षात अर्पण करणारी ठरली. त्यानिमित्ताने दररोज दुपारी ११ दिवस धार्मिक जप करण्यात आले. या निमीत्ताने १२५ जणांच्या आयबिलची करणाऱ्या तपस्वींच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी विजयकुमार नंदलाल कोचर यांनी संघाच्या वतीने पार पाडली.

प्रवचनात दोन्ही महासतीजींनी पू. श्री सौभाग्यमसा यांचे १३ व्या वर्षी घेतलेली दीक्षा, त्यांच्या धर्मसेवा, एकता, समता व मधुरतेसारख्या गुणांचे स्मरण करून श्रोत्यांना प्रेरित केले. जैन स्थानकात रोज सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघपती नितीन जैन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *