प्रतिनिधी (सिद्धार्थ तायडे)
नांदुरा : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे सक्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनराव पाटील यांनी काल दिनांक 11 नोव्हेंबर2025 रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पक्षाचा दुपट्टा दिला व त्यांचे पक्षात स्वागत केले. नगरपरिषद, महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरच मोहनराव पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबरदस्त झटका बसला असे बोलल्या जात आहे. मोहनराव पाटील हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुऱ्याचे विद्यमान संचालक आहेत. एक अभ्यासू व हुशार राजकारणी म्हणूनही त्यांची तालुक्यात ओळख आहे.या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी बाळापुर चे माजी आमदार खतीब साहेब, डॉ. धैर्यवर्धन फुंडकर , वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा समन्वयक राजाभाऊ भोजने,राजेंद्र शेगोकार, वसंतराव तायडे, अनंतराव लांडे सर, इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. मोहनराव पाटील हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षनिष्ठा पक्ष विचारधारा याच्याशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करतील त्यांच्या वंचित बहुजन आघाडीमधील पक्षप्रवेशामुळे नांदुरा तालुक्यासह मलकापूर विधानसभा मतदारसंघात पक्ष कार्याला बळकटी मिळेल अशी अपेक्षाही सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून व्यक्त केल्या जात आहेत.


























