नांदगाव । येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात आज शालेय पोषण आहार शिजवताना कुक्कर फुटला व यात शालेय पोषण आहार शिजवणार्या
संगिता सोनवणे व आशा काकळीज या दोन्ही महिला किरकोळ भाजल्या दैव बलत्वर म्हणून त्या
बचावल्या आहेत..
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी नांदगाव येथील नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात शुक्रवारी शालेय पोषण आहार शिजवताना कुक्कर फुटला यात संगिता सोनवणे व आशाबाई काकळीज या दोन महिला किरकोळ भाजल्या दैव बलत्वर म्हणून या महिला थोडक्यात बचावल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील शाळेचे मुख्याध्यापक जनाब शहीद अख्तर यांनी तात्काळ धाव घेऊन मदत केली व जखमी झालेल्या महिलांना औषधोपचार केले. आजच्या घटनेने शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन याबाबत सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांना न्याय मिळावा त्यांचे वेतनवाढ व्हावी यासह त्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी या महिला लढत असुन आज त्यांच्यावरच वाईट वेळ आली होती मात्र नशीब चांगले असल्याने कोणालाही जास्त इजा झाली नाही मात्र शासनाने आतातरी या महिलांचा विचार करावा व त्यांच्या मागण्या मान्य कराव्या शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांना देण्यात येणारे साहित्य देखील जुने झाले आहे ते बदलून मिळावे देण्यात येणारा किराणा उत्कृष्ट दर्जाचा मिळावा यासह इतर अनेक मागण्या आहेत त्याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी या माहिलांकडून करण्यात
येत आहे..
नांदगाव येथे शालेय पोषण आहार शिजवताना कुकर फुटल्याने दोन महिला भाजल्या






















