निफाड (कृष्णा गायकवाड-) निफाड वैनतेय विद्यालय येथे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते स्व प्रल्हाद पाटील कराड यांचा द्वितीय स्मृतिदिन संपन्न याबाबत निफाड येथील वैनतेय विद्यालयात आयोजित कार्यक्रमात शेती विषयावर बोलताना प्रमुख व्याख्याते व शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष कवी संदीप जगताप यांनी व्याख्यानात म्हटले निफाडच्या सध्याच्या परिस्थितीत शेतकर्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला कोणी तयार नाही शेतकर्यांच्या प्रश्नावर जे कोणी लढाऊ उभा द्यायला तयार होईल त्याच्या पाठीमागे शेतकर्यांनी आणि तरुणांनी ताकद द्यायला हवी शेतकर्यांच्या मुलांनी शेतीबरोबरच उद्योग व्यवसाय उभारले पाहिजे तसेच शेती करताना जगात काय चाललंय हे सुद्धा सध्याचे पिढीने समजून घेतलं पाहिजे असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माझे प्रतीक अध्यक्ष कवी संदीप जगताप यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वि .दा. व्यवहारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून हिरालाल सानप, सदाशिव सांगळे, रामनाथ आव्हाड, आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे स्वागत न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव रतन पाटील वडगुले यांनी केले तर प्रास्ताविक न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे विश्वस्त विश्वास कराड यांनी केले वैनतेय विद्यालयाचे पर्यवेक्षक गुलाब टकले सर यांनी स्व. प्रल्हाद पाटील कराड यांच्या जीवन कार्यावर आधारित लिहिलेले गित वैनतेय गितमंचने गायले या प्रसंगी वि.दा .व्यवहारे यांचे भाषण झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विवेक
उगमुगले यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर कराड यांनी केले एस. यु. वाघ यांनी पसायदान म्हटले या प्रसंगी संजय होळकर ,?ड अंजली उगावकर, शिवाजी ढेपले, बबन सानप ,राजेंद्र राठी, ?ड दिलीप वाघवकर, राजेश सोनी ,मधुकर राऊत ,संपत डुंबरे ,मुकुंद होळकर, शरद कुटे, कृष्णा आघाव, खंडू बोडके, हरिभाऊ बनकर, बाळासाहेब सानप ,मोतीराम वडघुले, सुनील वडघुले ,एडवोकेट अशोक घुगे, कचेश्वर दुसाने ,भारती कापसे, डॉक्टर सीमा डेरले, जनकीराम धारराव, माधव कुंदे, दिनकर कुयटे, संदीप शिंदे ,सुनील जाधव, दिलीप वासकर, गोविंद जगताप, रत्नाकर भागवत, कृष्णा नागरे, कमलाकर साठे शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
निफाड वैनतेय विद्यालय येथे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते स्व. प्रल्हाद पाटील कराड यांचा द्वितीय स्मृतिदिन संपन्न…






















