प्रतिनिधी-कृष्णा गायकवाड (पिंपळगाव बसवंत)
गावाचे सहा आधारस्तंभ एका क्षणात कायमचे हरपले…
पिंपळगाव बसवंत (ता. निफाड, जि. नाशिक) — सप्तशृंगी देवीच्या दर्शनावरून परतताना झालेल्या भीषण अपघातात गावातील नामांकित व सामाजिक जीवनात अग्रणी असलेल्या पटेल कुटुंबातील तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
गावाच्या इतिहासातील हा प्रसंग सर्वांत वेदनादायक आणि असह्य ठरला असून संपूर्ण पिंपळगाव शोकसागरात बुडाले आहे.
MH-15 BN 0555 या क्रमांकाचे वाहन परतीच्या प्रवासात अचानक खोल दरीत कोसळले. हा धक्कादायक अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहावा जणही उपचारादरम्यान प्राण गमावून बसला.
क्षणभरात तीन कुटुंबांचे चूल-वात, घरातील हसू, कर्तृत्व, आधार… सर्व काही उद्ध्वस्त झाले.
– गावाने हरवलेले अमूल्य जीव…
1️⃣ कीर्ती पटेल
2️⃣ रसीला पटेल
3️⃣ विठ्ठल पटेल
4️⃣ लता पटेल
5️⃣ पचन पटेल
6️⃣ मणिबेन पटेल
हे सर्वजण गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक जीवनात अत्यंत सक्रिय, प्रेमळ आणि आदरणीय स्थान राखणारे होते. त्यांच्या जाण्याने पिंपळगावच्या मातीत दुःखाचा अढळ दगड रोवला गेला असून प्रत्येक घरातून हंबरडा उसळत आहे.
—
🌿 गावात सर्वत्र शोककळा — पिंपळगाव शोकमग्न
घराघरांतून रडवेला वातावरण, डोळ्यांत पाणी आणि मनात अविश्वासाचे ढग दाटले आहेत.
गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणतात — “असा आघात पिंपळगावने कधीच पाहिला नव्हता.”
गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून श्रद्धांजलीपर कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
🙏 भगवान श्री सप्तशृंगी माताचरणी प्रार्थना
या सहा पवित्र आत्म्यांना चिरशांती लाभो.
या अथांग दुःखातून सावरायला परमेश्वर शक्ती देओ.
कुटुंबीयांच्या मनातील यातना कमी होऊ देत आणि गावाला सावरायला धीर मिळू दे.
🕯️ समस्त पिंपळगावकरांच्या वतीने कोटी-कोटी श्रद्धांजली
सहाजिकचं, गावकऱ्यांच्या हृदयात त्यांचे प्रेम, त्यांचे हास्य, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांची माणुसकी सदैव जिवंत राहील.


























