महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व प्रणेते शरद राव पवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या शेत रस्ते खुले करण्याच्या अभियान अंतर्गत आज दिनांक 01/08/2025 रोजी शशिकांत मंगरुळे साहेब उपविभागीय अधिकारी निफाड, विशाल नाईकवाडे साहेब तहसीलदार निफाड,भाबड साहेब उपअधीक्षक भूमी अभिलेख निफाड भारस्कर साहेब शिरस्तेदार, खेडकर साहेब,वराडे साहेब गांगुर्डे साहेब, सविता पठारे मॅडम, मुळक साहेब,जाधव साहेब घाडगे साहेब, थोरात साहेब पंचायत समिती, सर्व मंडळ अधिकारी साहेब, सर्व ग्राम महसूल अधिकारी साहेब,व विजय दरेकर,सुरेश वाटपाडे,रामकृष्ण हंडोरे योगेश आडसरे, नवनाथ सालगुडे, कृती समिती सदस्य निफाड यांचे उपस्थितीत शिव पानंद शेत रस्ते खुले करण्यासंदर्भात एकत्रित मीटिंग झाली.मीटिंगमध्ये पुढील विषयांवर चर्चा झाली मोजणी तारखा देऊन मोजणी न झालेल्या रस्त्यांची होण्यासाठी पुन्हा मोजणी साठी तारखा मिळाव्यात. मंडळ अधिकारी यांच्याकडे प्रलंबित अर्ज निकाली काढणे बाबत,मोजणी करताना किंवा हद्दी खुणा दाखविणे कामी शेतकऱ्यांनी अडथळा आणल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करणे बाबत. सातबारा उताऱ्यावर किंवा वाजीब अर्ज मध्ये शेत रस्त्यांच्या नोंदी घेताना रस्त्याची लांबी रुंदीचा उल्लेख असावा रस्ता केसेस लवकरात लवकर निकाली काढणे बाबत.गाव नकाशा वर नसलेले शेत रस्ते खुले करताना शासन निर्णयानुसार मोफत पोलीस मिळावा इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.मंगरूळे साहेब उपविभागीय अधिकारी निफाड व नाईकवाडे साहेब तहसीलदार निफाड यांनी शेत रस्त्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतलेले आहे . नासिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका शेत रस्ते खुले करण्याबाबत अग्रेसर आहे व शेत रस्ते लवकरात लवकर खुले करणे साठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. मीटिंग घेतल्याबद्दल कृती समिती निफाडच्या वतीने सर्वांना धन्यवाद देण्यात आले.
शेत रस्ते खुले अभियान करिता कृती समिती प्रयत्नशील






















