धाराशिव :- (सचिन लोमटे तुगावकर) कळंब तालुक्यातील मोहा गावात जिल्ह्याचे नेते मित्रा उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, मोदी सरकारचे ११वर्ष ‘संकल्प ते सिद्धी’ या अभियानाअंतर्गत मोदी सरकारच्या यशस्वी वाटचाली निमित्त
जिल्हा परिषद सदस्य, नेताजी आबा पाटील, कळंब पश्चिम मंडळ अध्यक्ष अरुण काका चौधरी,मोहा ग्रामपंचायत सदस्य, माजी तालुका सरचिटणीस, बालाजी मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.
नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व शासकीय योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जनता दरबाबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या जनता दरबारात पीक विमा, निराधार निवृत्ती वेतन, श्रावण बाळ योजना, शेतकरी अनुदान, शेतरस्ते अशा विविध तक्रारी व समस्यांची नोंद झाली. यातील काही समस्यांचे निरसन तात्काळ करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये
माजी सभापती धनंजय बप्पा वाघमारे,शेतकरी मोर्चा तालुका अध्यक्ष अशोक बप्पा मडके,मनोज साळूंखे,कांतीलाल धोंगडे सरपंच वाघोली,युवक नेते सचिन लोमटे तुगांव, बापूराव सावंत, गणेशजी देशमुख, संताजी वीर, सचिन वाघमारे,नानासाहेब यादव, बबलू शेख, हसन मुलांनी,बाबा कसबे, सुनिल भोंडवे, गावातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या तक्रारींना निवारण मिळाले असून, उर्वरित प्रकरणे संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मोहा येथे संकल्प ते सिध्दी अभियानांतर्गत जनता दरबार उत्सहात संपन्न






















