महापरिनिर्वाण दिनी निफाड येथे रक्तदान शिबिर*

निफाड ( प्रतिनिधी)
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी निफाड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. *”ब्लड फॉर बाबासाहेब”* या चळवळीच्या माध्यमातून जगभरात व देशभरातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळेस हा उपक्रम राबविण्यात आला. निफाड शहरात या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून या रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. निफाड शहर परिसर व तालुक्यातून अनेक रक्तदाते यामध्ये सहभागी झाले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुहास सुरळीकर, सचिन खडताळे, प्रतीक पगारे, विकास खडताळे राजेश लोखंडे, सागर निकाळे सतीश भालेराव, दादाराव काऊतकर, दुर्योधन गांगुर्डे, लखन खडताळे आदींनी परिश्रम घेतले उपक्रमासाठी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे नगरसेवक देवदत्त कापसे सामाजिक कार्यकर्ते देवा गांगुर्डे यांनी मोलाचे सहकार्य केले एसएमबीटी येथील रक्तपेढीस रक्त संकलन करण्यात आले यावेळी एसएमबीटी रक्तपेढीचे गणेश टोचे , सचिन आडके व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *